• Thu. Feb 26th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

 गोंदिया छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

 गोंदिया, दि.26 : राज्यात दि.18 फेब्रुवारी ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत समाधान शिबीर अभियान टप्पा-1” अभियान साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आयोजित करण्यात येत आहे.

      या अभियानांतर्गत शिबिरामध्ये प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे :- या टप्यात मंडळ स्तरावर सध्या विवादग्रस्त फेरफाराची संख्या निश्चित करून संबंधितास नोटिस बजावून शि‍बिरांचे दिवशी फेरफार निकाली काढण्यात येतील, सबळ कारणाशिवाय फेरफार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

 

        अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क :- या टप्यात 7/12 मधील चुकांसंदर्भात अर्ज स्विकारणे, आवश्यक कागदपत्राची तपासणी, त्रुटी सूची देणे व तात्काळ करता येणाऱ्या दुरुस्त्याची नोंद घेणे, या डेस्क वर भूमी अभिलेख विभागातील एक कर्मचारी उपस्थित राकणार आहे. डिजिटल 7/12, 8 (अ) उतारे तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

        लोकसेवा हक्क कायदा तात्काळ सेवा :- या टप्यात उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र इत्यादीबाबत अर्ज स्विकारणे तसेच पूर्वी प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील.

        अकृषक तरतुदी संदर्भातील सुधारणा बाबत मार्गदर्शन करणे :- यामध्ये अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणे (कलम 42 मधील सुधारणा). संपुष्टात आणलेल्या सनद प्रणालीबाबत (कलम 42अ, 42ब, 42क, 42ड). एकच वेळचे अधिमूल्य भरण्याची नवीन व्यवस्था. डिजिटल 7/12 ला कायदेशीर वैधताबाबत जनजागृती करणे.

         भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करणे :- या टप्यात खाजगी जमिनीचे भूसंपादन झाल्यानंतरही प्रत्यक्षात कमी-जास्त पत्रक तयार करुन गाव दप्तरातील सर्व नोंदी अद्ययावत न केल्यामुळे गाव दप्तराची उभारणी केली आहे.

        सुधारणा व नागरी सुविधा :- यामध्ये एक खिडकी व्यवस्था. शिबिरादरम्यान ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पी.एम. किसान, तक्रार निवारण आदी सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या अभियान कालावधीत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.