• Tue. Mar 10th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

चंद्रपूर मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या दिनांक 14 मार्च 2026 रोजी भद्रावती, जि. चंद्रपूर येथे ग्रेटा एनर्जी

ByNews Editor

Mar 10, 2026

चंद्रपूर  मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या दिनांक 14 मार्च 2026 रोजी भद्रावती, जि. चंद्रपूर येथे ग्रेटा एनर्जी

 

कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर

वृत्तांकनासाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या विशेष प्रवेश पासेसकरीता छायाचित्र सादर करणेबाबत….

महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, मा. मुख्यमंत्री महोदय यांचा दिनांक 14 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ग्रेटा एनर्जी कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी संभाव्य दौरा आयोजित होण्याची शक्यता आहे. सदर कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत.

सदर कार्यक्रमादरम्यान वृत्तांकनासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पोलीस विभागामार्फत विशेष प्रवेश पासेस (Security Entry Passes) देण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित प्रतिनिधींची छायाचित्रे व आवश्यक माहिती आगाऊ सादर करणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी यांनी खालील सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे व छायाचित्रे सादर करावीत :

सूचनाः

  1. संबंधित पत्रकार / प्रतिनिधींनी त्यांच्या वृत्तसंस्थेच्या अधिकृत पत्रासह स्वतःची 02 (दोन) पासपोर्ट साईज छायाचित्रे जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावीत.
  2. छायाचित्रे सादर करण्याचा कालावधी दिनांक 10 मार्च 2026 ते 11 मार्च 2026 असा राहील.
  3. छायाचित्रे स्वीकारण्याची वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत) राहील.
  4. प्रत्येक छायाचित्राच्या मागील बाजूस संबंधित पत्रकार / प्रतिनिधीचे पूर्ण नाव स्पष्ट व ठळक अक्षरात नमूद केलेले असावे.
  5. वरील कालावधीनंतर प्राप्त होणारी कोणतीही छायाचित्रे किंवा अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी विशेष नोंद घ्यावी.

टीप : आपल्या वृत्तसंस्थेमार्फत कार्यालयात देण्यात आलेल्या अतिरिक्त छायाचित्रांच्या अनुषंगाने पासेस तयार करण्यासंबंधी कोणतीही शंका अथवा माहिती आवश्यक असल्यास या कार्यालयातील लिपीक टंकलेखक श्री. सचिन खोब्रागडे (मो. नं. 7972931497) यांच्याशी संपर्क साधावा. अन्यथा संबंधित छायाचित्रे पासेस तयार करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पाठविण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

तसेच, सदर कार्यक्रमासंदर्भात सुरक्षेच्या कारणास्तव वृत्तांकनासाठी देण्यात येणाऱ्या प्रवेश पासेसची संख्या मर्यादित ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने या प्रक्रियेमध्ये वेब पोर्टल, डिजिटल मिडिया तसेच युट्यूब चॅनेल्स यांचा समावेश करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

सदर बाबींची योग्य ती नोंद घेऊन आवश्यक छायाचित्रे व कागदपत्रे वरील नमूद कालावधीत सादर करावीत, ही विनंती.

आपला स्नेही

स्वा/-

जिल्हा माहिती अधिकारी,

चंद्रपूर