अँकर . . वर्धा जिल्ह्यातील अलमडोह येथील युवक गौरव सुधाकर गावंडे याचा अपघाती मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर त्याच्या कुटुंबाला भारतीय स्टेट बँकेच्या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा मोठा आधार मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गावंडे याने भारतीय स्टेट बँक शाखेमध्ये वर्षाला 1000 रुपये प्रीमियम असलेला वैयक्तिक अपघात विमा (Personal Accident Insurance) काढला होता. अपघातात त्याचा मृत्यू झाल्यानंतर बँकेने विमा कंपनीकडे दावा दाखल केला.
या दाव्याची पूर्तता होताच भारतीय स्टेट बँक शाखेच्या वतीने शाखा व्यवस्थापक धनंजय देशपांडे यांनी गौरवच्या आई-वडिलांना खात्यात 20 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
केवळ 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून कुटुंबाला 20 लाख रुपयांचे आर्थिक संरक्षण मिळाल्याने या योजनेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
या प्रसंगी बोलताना शाखा धनंजय देशपांडे व्यवस्थापकांनी सांगितले की, अपघात कधीही सांगून येत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी अशा प्रकारचा अल्प बचतीचा विमा नक्की काढावा. 1000 रुपयांमध्ये मिळणारे 20 लाखांचे संरक्षण हे संकट काळात कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते, असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा
