हदगाव शहरातील जुने हदगाव परिसरातील श्री सत्य गणपती मंदिरात गणेशोत्सवानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. नवसाला पावणारा गणपती म्हणून श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात हदगाव शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
व्हॉइस ओव्हर :
१९४७ मध्ये स्थापन झालेल्या या श्री सत्य गणपती मंदिराचा २००५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे.
२००९ पासून गणेशोत्सवानिमित्त येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या महाप्रसादाचा दरवर्षी तब्बल पाच ते सात हजार भाविक लाभ घेतात. मंदिराच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमही राबविले जातात.
यंदाच्या महाप्रसादाला हदगाव श्रीकृष्णमठाचे मठाधिपती योगीराज बापू यांची प्रमुख उपस्थिती होती. धनंजय भारती सर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते महाप्रसादाची आरती संपन्न झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद सुरू करण्यात आला.
