• Fri. Sep 25th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

कन्नड “तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत कुस्ती स्पर्धेला उत्साहात सुरुवात ” कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे

ByAshok Mishra

Sep 25, 2026

कन्नड: तालुकास्तरीय शालेय क्रीड़ा स्पर्धेतील 2026/27 च्या 14,17,आणि 19 वर्षाखालील मुलांच्या विविध वजन गटातील कुस्ती सामन्याला कन्नड येथील भव्य क्रिडा संकुलात दिमाखाने सुरवात झाली.
या उद्घाटनप्रसंगी प्रभारी पोलीस उपअधीक्षक आरती पवार यांनी युवा खेळाडूंना जिद्द,मेहनत आणि व्यायाम. वेळ यांचे काटेकोरपणे पालन करने गरजेचे आहे तरच मातब्बर खेळाडू या कन्नड च्या मातीत तयार होऊन महाराष्ट्र चे नव्हे तर देशाचे नाव जागतिक पातळीवर घेऊन जातील, पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. पोलीस निरीक्षक सतीश दिंडे म्हणाले की अपार कष्ट केल्याशिवाय या उत्तम खेळाडू तयार होणे शक्य नाही, कुस्ती खेळात तयारी खूप महत्वाची जराही चूक झाली की डाव उलटा पडतो.
या स्पर्धेत 19 वर्षाखालील सर्व गटात मिळून 94 विद्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदविला.
14 वर्षाखालील गटातील प्राथमिक निकाल असा,
1) वसंत चव्हाण ( 35 किलो वजन गट) साने गुरुजी विद्यालय कन्नड, 2) हेमंत विठ्ठल राठोड ( 38 किलो वजन गट ) नवजीवन आश्रम शाळा आंबा तांडा, 3) प्रेम किरण इंगळे (44 किलो वजन गट ) कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालय कारखाना कन्नड, 4) अर्जुन गणेश नरोटे (48 किलो वजन गट ) श्री गणेश विद्यालय देवगाव रंगारी .
या कार्यक्रमात पोलिस उपअधीक्षक आरती पवार मॅडम, पोलीस निरीक्षक सतीश दिंडे, गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर, क्रिडा संयोजक मुक्तानंद गोस्वामी, प्रविण शिंदे, अविनाश काळे, श्याम खोसरे,करण राठोड आणि शेकडो क्रिडा रसिकांनी हजेरी लावली होती, तसेच कडबा चव्हाण, सचिन शेळके, भगवान म्हैसमाळे यांची ही उपस्थिति लाभली .
परीक्षक म्हणुन गोपाल बमनावत यांनी चोख काम बजावले, तर सूत्रसंचालन क्रिडा मार्गदर्शक प्रवीन शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन करण राठोड यांनी केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूना पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968