महाराष्ट्र,परभणी/प्रतिनिधी:- रमेश मुलगीर
राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्यासह आज परभणी जिल्ह्यातील मरडसगावं, दैठणा, आष्टी फाटा, पाथरी यासह परिसरातील दुष्काळसदृश्य भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा, अडचणी आणि पिकांची परिस्थिती जाणून घेतली.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकरी बांधवांसमोर निर्माण झालेल्या संकटाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हा निर्णय म्हणजे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा देणारा आहे. दुष्काळी परिस्थितीत आवश्यक त्या उपाययोजना, सवलती आणि मदत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, त्यांच्या हक्काची मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील.
शेतकऱ्यांच्या डोळ्यातील चिंता आणि त्यांच्या पिकांची झालेली अवस्था प्रत्यक्ष पाहताना या संकटाची तीव्रता जाणवली. संकट कितीही मोठे असले तरी शासन आणि शेतकरी यांच्यातील हा विश्वासाचा धागा अधिक मजबूत ठेवत, प्रत्येक अडचणीत शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार आहे…!
