• Sat. Sep 26th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

जालना : महाराष्ट्र संवाददाता : जगदीश राठोड

ByAshok Mishra

Sep 26, 2026

मंठ्यात जय भवानीचा दणदणाट! महाकालीचा थरार, कांताराचा जल्लोष अन् शिवतांडवच्या गजरात गणरायाला भव्य निरोप!

४२ व्या वर्षाच्या विसर्जन सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा भव्य आविष्कार; मंठेकर झाले मंत्रमुग्ध!

जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे संस्थापक अध्यक्ष असलेल्या शिवसेना पुरस्कृत जय भवानी गणेश मंडळाची विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या विसर्जन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे ठाणे येथील 12 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेले शिवतांडव ढोल-ताशा पथक, भव्य महाकाली लाईव्ह देखावा आणि अहिल्यानगर येथून सादर करण्यात आलेला आकर्षक कांतारा लाईव्ह देखावा पाहून मंठेकर मंत्रमुग्ध झाले.
जय भवानी गणेश मंडळाची यंदाची 42 वी वर्षपूर्ती असून, मंडळाने धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकीची परंपरा सातत्याने जोपासली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक कला-संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. मिरवणुकीची सुरुवात छत्रपती संभाजी राजे चौक येथून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, मारोती मंदिर, मारवाडी गल्ली, बोराडे गल्ली, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, ब्राह्मण गल्ली मार्गे मिरवणूक पारंपरिक विसर्जन स्थळी पोहोचली. यावेळी गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप दिला.
जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली इव्हेंट मॅनेजर चेतन घावट, ठाणे यांच्या नियोजनातून श्री गणेश विसर्जन सोहळा अत्यंत भव्य, दिव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मिरवणूकीत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, व्यापारी, मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शहरातील मुस्लिम बांधवांनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. विसर्जन मिरवणूक शांततेच्या वातावरणात पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968