शहरातील गजानन कॉलनी मध्ये चारित्र्याचा संशय घेऊन मुकेश बाळकृष्ण कुंभकर्ण याने पत्नी रोहिणी मुकेश कुंभकर्ण वय 44 वर्ष हिचा सोमवारी दिनांक 12 रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान डोक्यात लाकडी दांडा मारून तिचा खून केला, या घटनेने परिसरात आणि शहरात खळबळ उडाली.
रोहिणी हिचा विवाह मुकेश बाळकृष्ण कुंभकर्ण याच्याशी 2003 मध्ये झाला होता यांना ईशान वय 19 वर्षे, आणि निशा वय 22 अशी दोन अपत्य आहेत, सुरुवातीला त्यांचा संसार अगदी गुण्यागोविंदाने, सुरू होता पण मागील काही महिन्या पासून पती मुकेश हा पत्नी च्या चारित्र्यावर संशय घेत होता, वाद घालीत होता असे तक्रार दार मयत रोहिणी हिचा भाऊ रविन्द्र रामदास घडमोडे वय 45 (राहणार अंधारी, तालुका सिल्लोड)यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
या बाबत मयत रोहिणी हिने आई वडिलांना आणि भावाला सांगितले होते. त्यांनी ही मुकेश ला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला पण सगळे व्यर्थ गेले, पुढे रविन्द्र याने असे सांगितले की मागील 3 महिन्यापासून हे छ.संभाजीनगर येथील विष्णु नगर या भागात भाड्याच्या रूम मध्ये वास्तव्यास होते, तेथे ही त्यांच्या मध्ये नेहमीच भांडण होत होते.
मागील दहा पंधरा दिवसापूर्वी रोहिणी च्या भावाने मुकेश याला फोन करून असे सांगितले होते की माझ्या बहिणीला छ.संभाजीनगर मध्ये रहायचे नाही, याचे कारण मुकेश ने रविन्द्र याला विचारले असता तिने आपल्यावर.मुकेश माझ्यावर संशय घेत असल्याचे उल्लेख त्यांनी केला.
ते जोडपे मागील महिन्यात ही दाम्पत्य कन्नड येथे रहावयास आले होते.
पुढील घटनाक्रम रोहिणी नवरात्री च्या पहिल्या च दिवशी घरासमोरील दत्त मंदिरात सुरू असलेल्या गरबा दांडियात दांडिया खेळण्यासाठी गेली होती, रात्री उशिरापर्यंत तिने दांडिया मध्ये होती, नंतर ती घरात आली,याच घरात सासु निवृत्त शिक्षिका शशिकला व सासरे बाळकृष्ण कुंभकर्ण मागच्या रूम मध्ये झोपले होते, त्या रात्रीच या दोघांमध्ये संशयावरून वाद सुरू झाले, या वादातून मुकेश ने रोहिणी च्या डोक्यात आणि तोंडावर लाकडी दांड्याने मारहाण केली यात रोहिणी जागेवरच गतप्राण झाली, तेव्हा मुकेश ने घराच्या बाहेर निघून बाहेरून दरवाजा बंद केला आणि आपल्या दुचाकीवरून सकाळी 6 वाजता थेट पोलीस ठाण्यात गेला या ठिकाणी ठाणे अंमलदार बी. एम. पवार यांच्या समोर कबूल केले की मी माझ्या पत्नी ला जीवे मारून आलो, असे सांगताच ठाणे अंमलदार पवार निशब्द झाले, आणि त्यांनी या घटनेची माहिती प्रभारी सहायक पोलीस अधीक्षक आरती पवार यांना कळविले, त्यांनी लगेच सहायक पोलीस निरीक्षक सतीश दिंडे, सुकेशीनी कांबळे, सहायक फौजदार नासिर पठाण, राजकुमार कुकलारे,गणेश जैन, सुभाष पवार, यांना घेऊन घटनास्थळ गाठले.
बाहेर आवाज येत असल्या कारणाने मुकेश याचे वडील बाहेर आले, एवढे पोलिस का आले अशी त्यांनी विचारना केली असता, पोलीस अधीक्षक आरती पवार यांनी असे सांगितले की तुमच्या सुनेला मार लागला असून त्या जखमी आहेत तद्नंतर पोलिसांनी बेडरूम मध्ये प्रवेश केला तेथे रोहिणी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या दिसल्या त्यांना त्वरित रुग्ण वाहिनीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉ. रुखसान खान आणि डॉ. दत्ता देगावकर यांनी तपासून मृत घोषित करण्यात आले . या घटनेची अधिक माहिती फॉरेंसिक लैब चा अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
गजानन कॉलनी मध्ये निशा ब्युटीपार्लर या नावाने चालवित होत्या .
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पती r मुकेश बाळकृष्ण कुंभकर्ण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे त्यास उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक आरती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश दिंडे केली आहे.
