या संदर्भात शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती अशी की शहर पोलीस कन्नड येथे नोंद असलेल्या एक वर्ष जुना गुन्हा रजि.न. * 104/2025 * या मध्ये गुंगी येणारे औषध द्रव आणि मेंदू वर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम * 8,20,25,29 * अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 07 अमन सुशांत पाल वय 28 वर्षे राहणार कुठिगुडा ,कचरापडी, जि.गजपती ओडिशा (ओरिसा) हा आरोपी एक वर्षा पासुन फरार होता.
या आरोपीचा शोध घेत असताना तो ओडिशा (ओरिसा) राज्यातील एका तुरुंगात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, या प्राप्त झालेल्या. माहितीच्या आधारे कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री जारवाल, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील, पोलीस कॉन्स्टेबल श्री चौधरी यांनी ओडिशा राज्यात जाऊन वरील आरोपीचा कायदेशीर ताबा घेतला, आणि त्यास कन्नड शहर पोलीस ठाण्यात आणले.
सदर आरोपीस मा. न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत या सर्व गुन्ह्यातील तपास प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी आरती पवार मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सतीश दिंडे, करीत आहेत.
एक वर्षा पासुन फरार आरोपीला पर राज्यातून ताब्यात घेऊन तपासाच्या कक्षेत आणण्यात कन्नड शहर पोलिसांना यश आले आहे.
कन्नड ” कन्नड शहर पोलिसांनी ओडिशा च्या जेल मधून घेतला आरोपीचा ताबा ” कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे
