• Tue. Sep 15th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

जालना मंठा : जगदीश राठोड स्वखर्चातून विकासाला हातभार; इंजिनिअर प्रकाश चव्हाण यांचा आंभोड्यात स्तुत्य उपक्रम आदिवासी वस्तीतील रस्ता, खंडोबा मंदिर सभामंडपाचे काम; पाण्याच्या टाकीचे उद्घाटन

ByAshok Mishra

Sep 15, 2026

स्लग : गावाच्या विकासासाठी शासनाच्या निधीची वाट न पाहता सामाजिक बांधिलकीतून स्वतःच्या खर्चाने विकासकामे उभारण्याचा आदर्श इंजिनिअर प्रकाश चव्हाण यांनी आंभोडा येथे घालून दिला आहे…. त्यांच्या पुढाकारातून गावातील आदिवासी वस्तीमध्ये रस्त्याचे काम तसेच खंडोबा मंदिर परिसरातील सभामंडपाचे काम हाती घेण्यात आले असून, पाण्याच्या टाकीचे सभामंडपाचे उद्घाटनही करण्यात आले…
आंभोडा गावातील आदिवासी वस्तीमध्ये अनेक दिवसांपासून रस्त्याची समस्या होती. पावसाळ्यात चिखलामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन इंजिनिअर प्रकाश चव्हाण यांनी स्वखर्चातून रस्त्याचे काम सुरू केले…त्यामुळे वस्तीतील नागरिकांना वर्षभर सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे….
त्याचबरोबर खंडोबा मंदिर परिसरात सभामंडपाचे काम सुरू करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, सामाजिक उपक्रम तसेच ग्रामस्थांच्या विविध कार्यक्रमांसाठी हा सभामंडप भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे….
वस्तीवर पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्याच्या टाकीची उभारणी करून तिचे उद्घाटन करण्यात आले… या सुविधेमुळे नागरिकांना पाणी साठवणुकीसाठी मोठी मदत होणार आहे….
गावातील मूलभूत सुविधांसाठी स्वतःच्या खर्चातून पुढाकार घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी इंजिनिअर प्रकाश चव्हाण यांचे कौतुक केले…. ‘गावाचा विकास ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे,’ या भावनेतून करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आंभोडा गावाच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
स्वखर्चातून विकासकामे उभारून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इंजिनिअर प्रकाश चव्हाण यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे….

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */