कन्नड; आमदार संजनाताई जाधव यांच्या संकल्पनेतून राजयोग प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली. सतत तीन वर्षापासुन गणेशोत्सव काळात ही तालुकास्तरीय स्पर्धा कन्नड च्या गिरणी ग्राऊंड येथे आयोजित केली जाते, तालुक्यातील आणि शहरातील ढोल ताशा पथक यात हौशीने भाग घेतात.
या स्पर्धेत प्रथम येणार्या ढोल पथकास 31000 रुपये,द्वितीय 21000 रुपये तृतीय 11000 रूपये आणि सन्मान चिन्ह असे बक्षीस आयोजकां मार्फत देण्यात येते. या मध्ये अनेक पथक आपापले ढोल ताशे घेऊन सहभाग घेण्यासाठी उपस्थित होते ,
शहरातील माता भगिनी, आबालवृद्ध ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
सलग तीन
वर्षापासून प्रथम क्रमांक पटकावणारे कन्नड येथील भैरव प्रतिष्ठान या ढोल पथकाणे याही वर्षी पहिलाच क्रमांक पटकावला.त्यांचा 31,000 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला दुसरा क्रमांक वडारवाडा कन्नड येथील बजरंग ढोल पथक यांना 21,000 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तर तिसरे बक्षीस छावा ढोल ताशा पथक सरस्वती कॉलनी कन्नड यांना 11,000 हजार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तर स्पर्धेमधील सहभाग नोंदवणारा प्रत्येक ढोल ताशा पथकाला उत्तेजनार्थ पाच – पाच हजार रुपये देऊन आमदार संजनाताई जाधव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला आदित्यवर्धन जाधव, नगर अध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद सेठ, पोलीस प्रभारी डी.वाय.एस.पी आरती पवार ,काकासाहेब कवडे,शिवाजी थेटे, राम पवार, आणि शहरातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. शेवटी संजनाताई जाधव मित्र मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.
Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India.
Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India
Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com
Phone– +91 9315744968