• Wed. Sep 23rd, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे आयुष्मान आरोग्य मंदिराकडे रुग्णांची धाव हिवरखेड (वार्ताहर ) आयुष्मान आरोग्य मंदिर हिवरखेड येथे अकोला से रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ मिळणाऱ्या उत्कृष्ट आरोग्य

ByAshok Mishra

Sep 23, 2026

उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे आयुष्मान आरोग्य मंदिराकडे रुग्णांची धाव
हिवरखेड (वार्ताहर ) आयुष्मान आरोग्य मंदिर हिवरखेड येथे अकोला से रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ मिळणाऱ्या उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे व कर्मचाऱ्यांचा स्नेहपूर्ण वर्तणुकीमुळे आयुष्मान आरोग्य मंदिर हिवरखेड येथे रुग्णांचा ओढा वाढला असून येथील डॉ. वैशाली ठाकरे व डॉ.ज्ञानेश्वरी घुले व डॉ. पवनीकर उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवत आहेत. हिवरखेड हे चाळीस हजार लोकसंख्येचे शहर असून या गावाला लागून अनेक खेडे आहेत.प्रसुती,सर्पदंश, अपघात, विष प्राशन, हार्ट अटॅक किंवा इतरही अनेक प्रकारचे रुग्ण या आरोग्य केंद्रात दररोज येत असतात. या सर्व रुग्णांना उपलब्ध असलेली सर्वोत्कृष्ठ आरोग्य सुविधा पुरवून ही डॉक्टर मंडळी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे गंभीर रुग्णाला ताबडतोब अकोला पाठवण्यात येते. काही प्रकारच्या आजारावर औषध पुरवठा अपुरा असला तरी येथे रक्त तपासणी, इसीजी इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.आज बाहेरचा वैद्यकीय इलाज अतिशय महागडा झाला असून गरीब जनतेच्या आवाक्या पलीकडे गेला आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेची या आरोग्य केंद्रात काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे. येथील डॉक्टरांच्या सहकार्यामुळेच काही दिवसांपूर्वी या ठिकाणी भव्य आरोग्य शिबीर पार पडले होते ज्यात सातशे बारा रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. या ठिकाणी असलेला संपूर्ण कर्मचारी वर्ग रुग्णांप्रति सौजन्य दाखवत असल्यामुळे रुग्ण समाधान व्यक्त करत आहेत.
प्रतिक्रिया.
आयुष्मान आरोग्य मंदिर हिवरखेड येथे अतिशय चांगला इलाज केल्या जातो शिवाय डॉक्टरांची वागणूक अतिशय चांगली आहे.
सौ. गीताबाई भोम -रुग्ण
आरोग्य वर्धिनी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर आम्ही उपलब्ध सुविधे नुसार सर्वोत्तम उपचार करण्याचा प्रयत्न करतो
डॉ. वैशाली ठाकरे

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें