SULTANPUR जनपदीय बाल क्रीड़ा प्रतियोगिता का भव्य समापनचाणक्य न्यूज भंडारा
नरेंद्र शेंडे
:- भंडारा शहरातील तब्बल १३० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पांडे महालात गणरायाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या ऐतिहासिक वास्तूत विराजमान झालेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी भंडारा जिल्ह्यासह परिसरातून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. बाप्पाच्या दर्शनासोबतच पांडे महालाची ऐतिहासिक वास्तू आणि जुन्या काळातील कलाकुसर पाहण्याची संधी भाविकांना मिळत असल्याने यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरत आहे.
:- भंडाऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख असलेला पांडे महाल… तब्बल १३० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास जपणारी ही वास्तू आजही आपल्या भव्यतेने नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. रायबहादूर यादवराव पांडे यांनी सुमारे १८९५ च्या दरम्यान उभारलेला हा महाल ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा सुंदर नमुना मानला जातो. गणेशोत्सवाच्या काळात याच ऐतिहासिक महालात गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे, गणरायासाठी वेगळी भव्य सजावट किंवा आकर्षक देखाव्याची आवश्यकता भासत नाही. कारण पांडे महालाची ऐतिहासिक वास्तुरचना स्वतःच भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतेय. महालातील लाकडी खांबांवरील सुबक कोरीवकाम, जुन्या काळातील बांधकाम शैली, रंगीबेरंगी टाईल्स, तसेच लाल-निळ्या काचा असलेल्या खिडक्या पाहून भाविकांना भंडाऱ्याच्या जुन्या वैभवाची अनुभूती येत आहे.
BYTE :- डॉ. आश्विन पांडे ( पांडे कुटूंबीय वंशज )
BYTE :- ममता पांडे ( पांडे कुटूंबीय वंशज )
:- वर्षातून एकदाच गणेशोत्सवाच्या काळात या ऐतिहासिक महालातील विविध भाग पाहण्याची संधी भाविकांना मिळते. त्यामुळे गणपती बाप्पाचे दर्शन आणि ऐतिहासिक वास्तूची सफर, असा दुहेरी अनुभव भाविकांना मिळत आहे. पांडे कुटुंबीयांच्या वतीने गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे महाल परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे गणरायाची भक्ती… तर दुसरीकडे तब्बल १३० वर्षांचा ऐतिहासिक वारसा…भंडाऱ्याचा इतिहास आपल्या कुशीत जपणारा पांडे महाल आजही आपल्या भव्यतेची साक्ष देतोय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या ऐतिहासिक वास्तूला भक्ती आणि परंपरेचा नवा साज चढला असून, बाप्पाच्या दर्शनासोबतच भंडाऱ्याचा इतिहास अनुभवण्यासाठी पांडे महालाला एकदा नक्की भेट द्यावे
असे आवाहन यातून करण्यात आले आहे.
