• Wed. Sep 23rd, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

नांदेड | अतुल राऊतराव स्लग : चिराग गल्लीतील संतोष गणेश मंडळाचा अमरनाथ देखावा

ByAshok Mishra

Sep 23, 2026

भक्तांची अलोट गर्दी; नांदेड शहरातील चिराग गल्लीतील संतोष गणेश मंडळाचा अमरनाथ देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू

अँकर :

नांदेड शहरातील चिराग गल्ली येथील श्री संतोष गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारलेला अमरनाथचा सुंदर देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. बर्फाळ गुहेतील बाबा अमरनाथांचे पवित्र हिमलिंग पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.

व्हॉइस ओव्हर :

नांदेड शहरातील चिराग गल्ली येथे श्री संतोष गणेश मंडळाचा ५० वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त मंडळाने बाबा अमरनाथ यांच्या पवित्र हिमलिंगाचा आकर्षक देखावा साकारला आहे.

बर्फाळ गुहेची हुबेहूब प्रतिकृती, आकर्षक रोषणाई आणि भगवान अमरनाथांचे मनमोहक दर्शन यामुळे हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

बाबा अमरनाथांचे दर्शन घेण्यासाठी चिराग गल्लीमध्ये भक्तांची अलोट गर्दी होत असून, संतोष गणेश मंडळाचा हा देखावा गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968