हेडलाईन :
जय श्रीराम गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम; स्वच्छता, वृक्षारोपण अन् पांदण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार
🎙️ अँकर :
गणेशोत्सवाला सामाजिक कार्याची जोड देत हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथील जय श्रीराम गणेश मंडळाने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. मंडळाच्या कार्याची पोलीस प्रशासनानेही दखल घेत सन्मान केला.
🎥 व्हॉइस ओव्हर :
दहिभाते गल्लीतील दुर्लक्षित अंगणवाडी परिसराची मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. तसेच पोलीस पाटील दत्तात्रय मस्के, युवक आणि मंडळाच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. नागरिक व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पांदण रस्त्याच्या डागडुजीसाठीही मंडळाने पुढाकार घेतला आहे.
साहेबराव दहिभाते व प्रभाकर दहिभाते यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे हदगाव तालुक्यासह परिसरातून कौतुक होत आहे.
