हेडलाईन :
पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सविता निमडगे यांचा पुरस्काराने गौरव
🎙️ अँकर :
हदगाव तालुक्यातील पळसा येथील सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे यांचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नांदेड येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
🎥 व्हॉइस ओव्हर :
मीमांसा फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला. उमेद अभियानातून महिला सक्षमीकरण, पापड उद्योग, शिलाई व्यवसाय तसेच गरजू नागरिकांना मदत अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांत सविता निमडगे यांचे योगदान राहिले आहे.
