मुंडवाडी: तालुका कन्नड येथे मंडळाच्या वतीने गावातील तरुण आणि तरूणी यांच्या उत्स्फूर्त आणि खेळीमेळीच्या वातावरणात विविध स्पर्धांचे आयोजन करून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
या मध्ये पुरुषांसाठी कबड्डी, खो खो, तर महिलांसाठी दोरी उडी, ग्लास स्पर्धा ,रिंगण स्पर्धा आणि संगीत खुर्ची आदी स्पर्धांचा समावेश होता. बालगोपाल यांनी सुद्धा यात भाग घेतला.
या निमित्ताने गावातील महिला, पुरुष, आबालवृद्ध मोठ्या संख्येने दर्शक रुपात सहभागी झाले होते या स्पर्धेच्या निमित्ताने गावातील एकजुटीचे आणि बंधू भावाचे, सामाजिक सलोखा अधिक बळकट झाल्याचे चित्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते.
या वेळ राजे छत्रपती गणेश मंडळ, आदर्श गणेश मंडळ, जगदंबा गणेश मंडळ तसेच मुंडवाडी गणेश नगर मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या.
या संपूर्ण कार्यक्रम दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि आनंदी वातावरण निर्माण केले त्यांच्या सहभागामुळे वातावरण अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले.
कन्नड ” राजे छत्रपती गणेश मित्र मंडळ ( मुंडवाडी )तर्फे विविध स्पर्धाचे आयोजन ” कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे g
