कन्नड दिनांक 23/9/2026 रोजी पोलीस ठाणे कन्नड पासून जवळच असलेल्या भाजी मंडई येथे दोन अनोळखी इसम एम.एच.20 8830 क्रमांक असलेल्या सिल्वर कलरच्या मोटारसायकल वरून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या नुसार सहायक पोलीस निरीक्षक श्री. सतीश दिंडे आणि त्यांच्या पथका ने नामे 1) गोपाळ जगन्नाथ जायभाय, वय 24 वर्षे राहणार गुटमाळ तांडा ता.कन्नड. जिल्हा छ.संभाजीनगर, 2) करण उत्तम राठोड वय.20 राहणार गुटमाळ तांडा कन्नड जिल्हा छ.संभाजीनगर , या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे अंदाजे 110 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, दोन नकली पिवळसर रंगाचे कानातले, दोन चांदीच्या धातु सारखे दिसणारे नकली जोडवे, एक पिवळा धातूचा डोंब अंदाजे किंमत 2000 हजार रुपये, तीन मोबाईल हँडसेट आणि एक मोटारसायकल, असा एकूण 99,600 tरुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या दोघांची कसून चौकशी केली असता ही चोरी त्यांनी भोकरदन तालुक्यातील तांदुळवाडी येथे केली आहे अशी कबुली दिली असून भोकरदन पोलीस ठाण्यात कैलास दादाराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रजि.510/2026 नुसार बी.एन.एस कलम 305 अन्वये गुन्हा नोंद असल्याचे नमूद आहे.
ही माहिती पुढील तपासासाठी भोकरदन पोलीस ठाण्यास कळविण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी परीक्षार्थी प्रभारी पोलीस उपअधीक्षक आरती पवार मॅडम यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक श्री. सतीश दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार सागर सुलाने, श्री. प्रदीप चव्हाण, आणि विशाल लोंढे यांनी केली आहे.
