• Fri. Sep 18th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

जादूटोण्याच्या संशयास्पद प्रकाराचा छडा; ब्राम्हणवाडा थडी पोलिसांकडून पाच जण ताब्यात

ByAshok Mishra

Sep 18, 2026

अमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा थडी : हिंदू स्मशानभूमीत मृत व्यक्तीच्या दफनस्थळी संशयास्पद पूजाविधी करून जादूटोणा केल्याच्या प्रकरणात ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी तत्पर कारवाई करत पाच संशयित आरोपींना काही तासांतच ताब्यात घेतले. या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन ब्राम्हणवाडा थडी येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी अपराध क्रमांक 461/2026, कलम 3(1), 3(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या चुलत भावाचा महेन्द्र राजू गवळी (वय 27 वर्षे) यांचा मृत्यू झाल्यानंतर दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजता हिंदू स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 7.30 वाजता, फिर्यादीच्या मित्राने फोन करून स्मशानभूमीत कोणीतरी संशयास्पद पूजाविधी केल्याचे दिसत असल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच फिर्यादीने स्मशानभूमीत जाऊन पाहणी केली असता, मृत व्यक्तीच्या दफनस्थळाजवळ तंबाखू, चार अगरबत्त्या, माचिस, फुटाणे, छोटी अत्तराची बाटली आणि काळी टोपी आदी साहित्य आढळून आले. तसेच स्मशानभूमीच्या कंपाऊंडलगत लाल रंगाची होंडाई कंपनीची एसेंट कार (क्रमांक MH 03 CH 2665) आढळून आली.

या प्रकारामुळे मृत व्यक्तीला जागृत करण्याच्या उद्देशाने कोणीतरी जादूटोणा अथवा पूजाविधी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत वर नमूद पाच संशयितांचा काही तासांत शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेले संशयित आरोपी

1. निलेश मनोहरराव सोनटक्के (वय 34), रा. संतोषी नगर, विलास नगरच्या मागे, गल्ली क्र. 01, अमरावती.

2. सुबोध प्रकाश भोयर (वय 30), रा. उदखेड, पोस्ट पार्डी, ता. जि. अमरावती.

3. आशुतोष महादेव तायडे (वय 30), रा. समता निवास, गोमाजी नगर, कौलखेडा, अकोला.

4. साहेबराव पांडुरंग गायकवाड (वय 56), रा. समता नगर, सोमाटनी, ता. मावळ, जि. पुणे; ह.मु. उल्हासनगर, गायकवाड पाडा झोपडपट्टी, ठाणे.

5. चंदू गणेशलाल गुप्ता (वय 43), रा. कुंभारपुरा, ब्राम्हणवाडा थडी, ता. चांदूर बाजार.

या प्रकरणाचा पुढील तपास ब्राम्हणवाडा थडी पोलीस करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

सदरची कारवाई मा. निकेतन कदम, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांच्या आदेशाने तसेच दत्ता तोटेवाड, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, ईशानी आनंद, भापोसे, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग अचलपूर आणि पोलीस निरीक्षक अशोक लांडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, ठाणेदार, पोलीस स्टेशन ब्राम्हणवाडा थडी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू मरास्कोल्हे, पोहेकॉ हेमंत येरखडे तसेच पोलीस शिपाई अनुप मानकर यांनी सहभाग घेतला पुढिल तपास ब्राम्हणवाडा थडी पोलीस करीत आहेत, जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें