• Fri. Sep 18th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

कन्नड “पिशोर पोलिसांची अवैध वाळू वाहतुकी विरुद्ध जबरदस्त कारवाई ” 50, 42, 000 . किंमतीचा मुद्देमाल जप्त,

ByAshok Mishra

Sep 18, 2026

कन्नड प्रतिनिधी : रायभान साळवे

पोलिस ठाणे पिशोर च्या हद्दीत परवा रात्री 10. 50 च्या वेळी सिल्लोड- चिंचोली ली. रोड वरील शेलगाव फाटा येथे अवैध गौण खनिज वाळूची वाहतूक विना परवाना करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली.
या कारवाई मध्ये आरोपी सोहेल राजू शहा वय 26 वर्षे राहणार धनगर गल्ली फुलंब्री जिल्हा छ.संभाजीनगर याच्या कडून एक हायवा ट्रक व अंदाजे 6 ब्रास वाळू असा एकूण 50,42,000, किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले या आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.
सदर प्रकरणी कलम 303(2)बी.एन.एस. 21(1) ,(2), (3),(4),(5)गौण खनिज अधिनियम कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पिशोर पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक, गवळे, पोलीस हवालदार श्री मोरे पोलीस कॉन्स्टेबल गणेश कव्वाल, पोलीस कॉन्स्टेबल राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल घुगे व पोलीस कॉन्स्टेबल म्हस्के यांनी यशस्वी रित्या पार पाडली.
ही कारवाई मा.पोलिस अधीक्षक श्री प्रकाश भा. जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत स्वामी व मा.सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री कुणाल सुर्यवंशी यांनी यशस्वी केली.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें