अँकर . . वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे शंकर मंदिर गणेश उत्सव समितीच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली.
यावर्षी शंकर मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी विधिवत पूजा-अर्चा करून, ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गावातील अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
या उत्सवादरम्यान 10 दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दररोज सकाळ-संध्याकाळ महाआरती, भजन, आणि मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
शांतता आणि एकोप्याने हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन शंकर मंदिर गणेश उत्सव समिती, अल्लीपूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा
