हेडलाईन :
१०२ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मानाच्या गणरायाची पालखीतून मिरवणूक
अँकर :
हदगाव शहरातील १०२ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मानाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने पालखीतून काढण्यात आली. यावेळी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या उपस्थितीत आरती संपन्न झाली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
व्हॉइस ओव्हर :
मानाच्या गणरायाच्या मिरवणुकीनंतर शहरातील विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांनाही सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, भजनी मंडळांची साथ आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेशभक्तांनी उत्साहात बाप्पाला निरोप दिला.
विसर्जन मिरवणुकीत माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह नागरिक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देत यंदाचा गणेशोत्सव उत्साहात पार पडला.
