• Sat. Sep 26th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

नांदेड | हदगाव | अतुल राऊतराव स्लग : हदगावात गणरायाला भावपूर्ण निरोप हेडलाईन :

ByAshok Mishra

Sep 26, 2026

नांदेड | हदगाव | अतुल राऊतराव
स्लग :

हदगावात गणरायाला भावपूर्ण निरोप

हेडलाईन :

मानाच्या गणपतीची पालखीतून मिरवणूक; हजारो भाविकांचा सहभाग

 

१०२ वर्षांची परंपरा असलेल्या हदगावच्या मानाच्या गणपतीला आज भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. पालखीतून निघालेल्या या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले. ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.

व्हॉइस ओव्हर :

हदगावच्या मानाच्या गणपतीची आरती झाल्यानंतर पालखीतून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी मिरवणुकीत सहभागी होत प्रशासनाला सहकार्य केले.

आझाद चौकातील समता गणेश मंडळाने डीजेला फाटा देत पारंपरिक भजनी मंडळासह मिरवणूक काढली. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

रात्री गोजेगाव येथील पैनगंगा नदीवर गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968