• Wed. Sep 16th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

नांदेड / हदगाव | अतुल राऊतराव स्लग : पिंगळीतील हिंदू स्मशानभूमीच्या जागेच्या नोंदीसाठी आमरण उपोषण

ByAshok Mishra

Sep 16, 2026

स्लग : पिंगळीतील हिंदू स्मशानभूमीच्या जागेच्या नोंदीसाठी आमरण उपोषण

अँकर :
हदगाव तालुक्यातील मौजे पिंगळी येथील हिंदू स्मशानभूमीच्या जागेची सातबारा उताऱ्यावर तात्काळ नोंद करण्यात यावी, या मागणीसाठी यादवराव भावनाजी चव्हाण आणि अशोक धोंडबाराव मुकटे हे हदगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

व्हॉइस ओव्हर :
पिंगळी येथे हिंदू समाजासाठी मागील अनेक वर्षांपासून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध असून, याच ठिकाणी नागरिकांकडून अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र, सदरील जागेची सातबारा उताऱ्यावर स्मशानभूमी म्हणून नोंद नसल्याने जागेवर अतिक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही जागा स्मशानभूमीसाठीच कायमस्वरूपी राखीव राहावी आणि भविष्यात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी उपोषणकर्त्यांनी तहसील प्रशासनाकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने दिल्याचे सांगितले. मात्र, अद्याप ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

प्रशासनाने तात्काळ जागेचा पंचनामा करून महसूल अभिलेखात ‘हिंदू स्मशानभूमी’ अशी नोंद करावी आणि स्मशानभूमीच्या जागेचे संरक्षण करावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
बाईट: यादवराव चव्हाण
बाईट : अशोक मुकटे

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

ब्रेकिंग न्यूज़ देवेंद्र प्रताप सिंह, ब्यूरो चीफ, चाणक्य न्यूज़, बहराइच एसपी बहराइच की विशेष पहल का असर: टूटने की कगार पर पहुंचे 02 परिवारों में कराई सुलह, फिर एक साथ रहने पर बनी सहमति
स्लग:- त्यौहारो की सुरक्षा को लेकर अलर्ट मोड पर केसीजी पुलिस, गणेश पंडालों का निरीक्षण कर समितियों को दिए आवश्यक सुरक्षा निर्देश लोकेशन:- केसीजी जिला:- ब्यूरोचीफ रिपोर्टर:- संजू महाजन
उर्फी रिज़वी की रिपोर्ट गाजीपुर गाज़ीपुर में NDRF की स्थायी यूनिट की मांग, यूनाइटेड मीडिया पत्रकार एसोसिएशन ने डीएम के माध्यम से मुख्यमंत्री को भेजा ज्ञापन

अन्य ख़बरें

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */