• Tue. Sep 22nd, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

नांदेड | हदगाव | अतुल राऊतराव स्लग : 🚩 १०२ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा

ByAshok Mishra

Sep 22, 2026

हेडलाईन :
हदगावच्या मानाच्या गणरायाची १०२ वर्षांची परंपरा; सामाजिक उपक्रमांची रेलचेल

अँकर :
हदगाव शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना १९२५ साली झाली असून, यंदा मंडळाच्या परंपरेला १०२ वर्षे पूर्ण झाली आहेत. धार्मिक कार्यक्रमांसोबतच मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.

व्हॉइस ओव्हर :
मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यांसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. दररोज सायंकाळी आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावेळी हदगाव येथील ‘
हे राम मित्र मंडळा’च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

गणेशोत्सवात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असते. गणेश विसर्जनाची मिरवणूक पालखीतून काढण्याची परंपराही मंडळाने आजवर जपली आहे. १०२ वर्षांची ही परंपरा हदगावच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968