या संदर्भात पुढील माहिती अशी की मा.आमदार संजनाताई जाधव यांनी घेतलेल्या पुढाकाराने वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख इतकी आर्थिक मदत त्यांच्या ,आणि जिल्हाधिकारी श्री विनय गौडा, उपविभागीय अधिकारी श्री संतोष गोरड तहसीलदार श्रीमती सारिका भगत यांच्या वतीने धनादेशाद्वारे कुटुंबातील व्यक्तिंना सुपूर्द करण्यात आली.
निसर्गाने अचानक केलेला हा कहर एकाच कुटुंबातील 3 महिलांना मृत्यूच्या दाढेत घेऊन गेला ,या घटनेमुळे आख्या कन्नड तालुक्यातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली पण निसर्गापुढे कोण काय करणार होते.
अशा या संकटाच्या काळात शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाल्याने मृतांच्या नातेवाईकांना थोडा आधार मिळाला आहे
या संकटाच्या काळात प्रशासनाने तातडीची मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल पिशोर मध्ये नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वीज पडून मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांना चार लाखाची मदत ” कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे
