• Tue. Sep 22nd, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

अंडरग्राउंड पूल व पुराच्या समस्येबाबत आंदोलन, :- गोंदिया, २१ सप्टेंबर, शहरातील भुयारी यादव चौक, आवारा जवळील अंडरग्राउंड पूल दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुराच्या गंभीर समस्येवर शिवसेनेच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले.

ByAshok Mishra

Sep 22, 2026

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष, पंकज यादव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख व शहर सेवक .यासह सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलन मार्फत, जिल्हाधिकारी, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगराध्यक्ष व रेल्वे विभाग यांना निवेदन देण्यात आले, पुलाची तात्काळ तपासणी करून,आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करावी आणि पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली,

पंकज यादव म्हणाले की पावसाळ्यात पाणी साचल्याने शाळकरी मुले, महिला, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असते, रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. जुन्या पुलावर पाणी शिरल्याने सुरक्षेबाबतही गंभीर चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात असते,

प्रशासनाने तातडीने दोन्ही समस्यांच्या जागेची पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या समस्या लवकर मार्गी न लागल्यास जनहितार्थ यापुढे बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला,

सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968