देवगाव (रंगारी) येणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन सौहार्द पूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी येथील पोलीस ठाण्या पोलीस इन्स्पेक्टर श्री गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा रूटमार्च आज बाजाराच्या दिवशी खेड्यापाड्यातून आलेल्या नागरिकांना पण पोलिसांचा धाक असावा कोणीही आपल्या गावातील विसर्जन मिरवणूक मध्ये चुकीचे काम करू नये यासाठी हे पथ संचलन करण्यात आले.
येणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मध्ये गावातील संवेदनशील मार्गावर, बाजारपेठ भागात, आपली उपस्थिती पोलिसांनी नागरिकांना दाखविली.
या मध्ये पोलिस अधिकारी आणि पोलीस जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीने बाजार पेठे सह गावातील मुख्य मार्गावरून संचलन केले.
देवगावातील आणि आजूबाजूच्या खेड्यात सुरक्षेच्या भावना नागरिकांमध्ये. सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी हा रूटमार्च काढण्यात आला.
हा उत्सव समस्त समाजबांधवांनी एकत्रित आणि गुण्यागोविंदाने साजरा करावा असे आवाहनही पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले. मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता मंडळाच्या अध्यक्ष आणि कार्यकर्ते घेतील ही अपेक्षा पोलीस प्रशासनाने नागरिकांना केली.
या काळात समाज माध्यम मध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक सलोखा बिघडणार नाही असे पोस्ट करू नये, असे काही झाल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन पोलीस इन्स्पेक्टर श्री गोरे साहेब यांनी केले. या सहायक फौजदार सलीम शहा आणि पोलीस सामील झाले.
कन्नड “आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी देवगाव (रंगारी)पोलिसांचे पथ संचलन ” कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे
