मंठ्यात दुष्काळाची दाहकता; खासदार डॉ. कल्याण काळे उतरले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर!
प्रति हेक्टर ७५ हजार रुपये शेतकऱ्यांना द्या – खासदार डॉ. कल्याणरावजी काळे यांची मागणी
मंठा : जगदीश राठोड
मंठा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विवेक घारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याणरावजी काळे आणि जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कल्याणरावजी दळे यांच्या उपस्थितीत दुष्काळ पाहणी दौरा संपन्न झाला.
या दौऱ्यादरम्यान खासदार डॉ. कल्याणरावजी काळे यांनी मंठा तालुक्यातील विविध भागांतील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान तसेच शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या विविध अडचणींची त्यांनी माहिती घेतली.
त्यानंतर मंठा तहसील कार्यालयात तहसीलदार सुमन मोरे यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनामध्ये दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर **शासनाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ७५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. कल्याणरावजी काळे यांनी केली.
शेतकऱ्यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या दुष्काळ पाहणी दौऱ्याप्रसंगी अशोक उबाळे, निळकंठ वायाळ, बदर चाऊस, सुनील चौधरी, सुरेश वावळे, सुरेश पवार, रौफ भाई परसुवाले, शेख साजिद, प्रकाश घुले, तुळशीराम गायकवाड, गणेश घारे, अब्दुल रऊफ, मुरलीधर घारे, बंडू घारे, कारभारी केंदळे, बबनराव दराडे, चिंतामणी गाडेकर, लक्ष्मण रेंगे, आसाराम चोरमारे, अर्जुनराव घारे, शिवाजी गडदे, अरुण कांगणे** यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच ठेंगे, वडगाव, हिवरखेडा, पिंपरखेडा, सावरगाव, बरबडा, केंदळी आणि उमरखेडा या गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने दुष्काळ पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी आणि त्यांच्या नुकसानीची योग्य ती भरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
