• Thu. Sep 24th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

रास्ता रोको प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्त्यां सह इतरांवर गुन्हे दाखल

ByAshok Mishra

Sep 24, 2026

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

मानवत तालुका दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी, या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मानवत येथे केलेल्या रस्ता रोको आंदोलन प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार विलास मोरे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 12.10 वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप चौकात राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 वर जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर मंडळी जमवून रस्ता रोको केल्याने सार्वजनिक वाहतूक ठप्प झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी विठ्ठल अर्जुन चोखट (रा. सारंगपूर, ता. मानवत) दत्तराव परांडे (रा. सारंगपूर, ता. मानवत) नामदेव पांडुरंग काळे (रा. सावळी, ता. मानवत) गोविंद मदनराव घाडगे (रा. मानवत) ज्ञानेश्वर अनिल चिलवंत (रा. रत्नापूर, ता. मानवत) यांच्या सह इतर 10 ते 12 जनांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 सह भारतीय न्याय संहिता कलम 223, 126(2), 189(2), 189(3), 189(5), 190 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आले आहेत.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968