• Thu. Sep 24th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

नांदेड | हदगाव | अतुल राऊतराव स्लग : हदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी हेडलाईन :

ByAshok Mishra

Sep 24, 2026

दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; तहसीलदारांना निवेदन

अँकर :

हदगाव–हिमायतनगर तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा जिल्हाध्यक्ष शंकर एस. जगदाळे यांनी केली आहे. याबाबत हदगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

व्हॉइस ओव्हर :

दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई, शेतमजुरांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान, जनावरांसाठी चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच पीक कर्जवसुली थांबवून कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावा, फळबागांसाठी आर्थिक मदत द्यावी आणि शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

बाईट: निळु पाटील कल्याणकर

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968