मागील 12 दिवसापासून घराघरात आपल्या लाडक्या गणरायाची भक्ती भावाने पूजा अर्चना केल्यानंतर गणेश भक्तांनी आज बाप्पा ला निरोप दिला.
शहरात तब्बल पस्तीस ते चाळीस मंडळानी स्थापना केली होती, त्यातील पंचवीस ते तीस गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता, शहरातील माळीवाडा येथील हनुमान मंदिरापासून निघालेल्या या सार्वजनिक मिरवणुक काढण्यात आली होती, ती पुढे पोलीस ठाणे, तहसील कार्यालय,अण्णाभाऊ साठे चौक येथून लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्या जवळ उभारलेल्या मंचा समोर येऊन ढोल ताशा यांची प्रात्यक्षिक दाखविण्यात आल्यानंतर पुढे शनि मंदिर, सिद्दीक चौक मार्गे शीतल माता गल्ली जवळच असलेल्या राम बावड़ी येथे सामुहिक आरती करून गणपती विसर्जित करण्यात आले.
शासकीय कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या तहसील कार्यालया ची विसर्जन मिरवणूक दुपारीच काढली होती त्यात कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होऊन सहभाग नोंदविला.
यंदाची मिरवणुकीत गुलाला एवजी फुलांचा वापर केला यामुळे पर्यावरण पूरक संदेश देण्यात आला. मिरवणुकी दरम्यान सेवाभावी संस्थानी गणेश भक्तांसाठी नाश्त्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
काही मंडळानी शहरापासून जवळ असलेल्या आंबाडी प्रकल्पात गणेश विसर्जन केले.
कन्नड ” पुढच्या वर्षी लवकर या ” च्या निनादात कन्नड मध्ये “बाप्पा ” निरोप ” कन्नड प्रतिनिधी : रायभान साळवे
