• Sun. Sep 27th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

भंडारा – मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी…

ByAshok Mishra

Sep 27, 2026

भंडारा –

मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी…

मोहाडी, दि. २६ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील ३६८ तालुक्यांपैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.मोहाडी तालुक्यात पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच धान पिकावर मावा, करपा व तुडतुडा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोहाडी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर मा. खासदार प्रशांतभाऊ पडोळे यांनी दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी मोहाडी तालुक्यातील आंधळगाव जि. प. क्षेत्र व कांद्री जि. प. क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धान पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व पिकाच्या नुकसानीची माहिती घेतली.यानंतर खासदार प्रशांतभाऊ पडोळे यांनी जिल्हाधिकारी, भंडारा यांच्याशी चर्चा करून मोहाडी तालुक्यातील परिस्थितीची पुन्हा चौकशी करून राज्य शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.त्यावर जिल्हा प्रशासनाकडून मा. खा. महोदयांना दूरध्वनी वरून फेर चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर करून नाव समाविस्ट करण्याचे आश्वासन दिले.यावेळी मा. नरेशभाऊ ईश्वरकर, जि. प. बांधकाम सभापती भंडारा, मा. गजाननभाऊ झझाड, जिल्हा महासचिव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भंडारा,मा. देवाभाऊ इलमे जि. प. सदस्य भंडारा, मा. श्रीकांतभाऊ येरपुडे जिल्हाध्यक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग भंडारा,मा. जयंतभाऊ सोनकुसरे मोहाडी तालुका ओबीसी विभाग, मा. शुभमभाऊ धूमनखेडे मा. शशीकांतभाऊ नागफासे, मा. रामदासजी खडसे,मा. हिराचंदजी वरकडे,मा. जगदीशजी तुपट, मा. छोटूजी चवळे मा. भूपेंद्रजी नागफासे सरपंच हिवरा, मा. रामदासजी पडोळे, मा.महेंद्र शिवराम मते अध्यक्ष (संरपच),
मा.चंद्रशेखर रामशिंगजी मेंढे उपाध्यक्ष,मा.नारायण रुधाजी वरकडे सदस्य, मा.शंकर रुधाजी वरकडे सदस्य, मा.मोरेश्वर सुरेशजी मेंढे सदस्य,मा.अंकुश गंगारामजी कानतोडे रोजगार सेवक, मा. हेमराज लक्ष्मणजी पटले शिपाई ग्रां. प.,मा.रुपेश गोपीचंदजी वरकडे सि आर एफ जवाण,
मा.आयुष्य संजयजी नागपुरे युवा सहकारी,मा. प्रताप आनंदराव डोमळे तं मुक्ती अध्यक्ष,मा.हीराचंद कोदुजी वरकडे काँग्रेस बुध प्रमुख,मा. भावेश संजयजी नागपुरे मा. राधेश्यामजी अतकरी, मा. जसवंतजी धुमनखेडे, मा. किशोरजी झझाड, श्री शुभमजी ठाकरे, श्री परागजी चामट,श्री सारंगजी मोरांडे,श्री विजयजी बालपांडे, श्री रुपेशजी वरकडे, श्री सौरभजी पिलारे, श्री सौरभजी सेलोकर, श्री ओमजी ठाकरे,श्री सौरभजी पिंगरे, श्री अक्षयजी हटवार,श्री आदित्यजी पिलारे, श्री गजेंद्रजी बालपांडे,श्री परेशजी चामट, श्री अमनजी चिंचोलकर, श्री प्रफुलजी चामट, श्री कमलेशजी हटवार, श्री निशांतजी वघारे, श्री आयुषजी नागपुरे, श्री नाणेश्वरजी पटले,श्री मोरेश्वरजी मेंढे श्री उमेशजी भसगवरे, श्री कवडूजी मेश्राम, सूर्यभान शिवरकर श्री प्रणयजी बारई श्री मोरेश्वरजी सेलोकर धूसाळा श्री आशिषजी हजारे श्री देवाजी उरकुडे श्री कोमलजी उरकुडे श्री शिवदासजी उरकुडे श्री रुपचंदजी भर्रे श्री जगदीशजी तुपट श्री नंदकिशोरजी झझाड श्री चंद्रशेखरजी चवळे श्री अतुलजी झझाड श्री अमितजी पुडके श्री सुरेशजी तडस श्री शंकरजी मतारे श्री नरेंद्रजी पुडके श्री गजाननजी कानतोडे श्री राहुलजी चवळे श्री सुभाषजी पुडके श्री अनीलजी अतकरी श्री अतुलजी पुडके श्री संदीपजी मते श्री खेमराजजी तडस श्री नितेशजी मोहनकर श्री अनीलजी चवळे श्री हिमांशूजी रामटेके श्री रविंद्रजी पडोळे श्री देवदासजी पडोळे श्री अनिरुद्धजी डहाके, श्री शालिकजी वालदे,श्री विलासजी बडवाईक, श्री दिपकजी बोकडे, श्री विनायकजी बावणे, मिताराम सोनकुसरे तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

चाणक्य न्यूज
नरेंद्र शेंडे भंडारा

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968