• Fri. Sep 11th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

कन्नड “नागरिक महागाईच्या काळात त्रस्त असताना गॅस डिलिव्हरी करणारा आकारतो 50 रुपये. ” कन्नड च्या गंगासागर गॅस एजन्सी चा प्रताप. कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे

ByAshok Mishra

Sep 11, 2026

कन्नड

“नागरिक महागाईच्या काळात त्रस्त असताना गॅस डिलिव्हरी करणारा आकारतो 50 रुपये. ” कन्नड च्या गंगासागर गॅस एजन्सी चा प्रताप.

कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे

कन्नड शहरात indane गॅस वितरित करणारी एजेंसी आहे अनेक खेड्यापाड्यातील गिर्‍हाईक या एजन्सी मार्फत गॅस कनेक्शन घेतात आणि घेत आहेत .तब्बल हजारो ग्राहक या वितरण कंपनी शी निगडित आहे.

एक दिवस गॅस नसला तर काय त्रेधातिरपीट उडते हे घर चालवणार्‍या माता भगिनींना चांगले ठाऊक आहे, आणि तो सिलिंडर आणण्यासाठी घरमालकांची होणारी तारांबळ ही बघाविशी वाटत नाही तो एक सिलिंडर आणायला त्याला काय धावपळ करावी लागते हे न सांगितले तेच बरे.

गॅस वितरण करण्यात येणार्‍या वितरकांना गॅस कंपनी एका सिलिंडर मागे अंदाजे 70 ते 80 रुपये कमीशन देत असते, नव्हे देतात त्यात घरपोच सेवा करण्यात येणार्‍या डिलिव्हरी करणारे यांचे 20 ते 30 रुपये समाविष्ट असतात. तरी ग्राहक टाकी घरपोच मिळाली म्हणुन 20 एक रुपये स्वखुशीने गॅस पोहोचविला त्याला देतात तसा नियम नाही पण देतात.

तरी कन्नड येथील गंगासागर गॅस वितरीत करण्या साठी येणारे गाडीवाले स्पष्ट पणे सांगतात की 50 रुपये लागतील नाही तर गॅस मिळणार नाही.
ठरविलेल्या किमंत मध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही गोडाउन येथे जाऊन घ्या. अशी अरेरावी ची भाषा करतात.
याची माहिती distributor ला माहीत आहे की नाही त्यांना याची कल्पना आहे की नाही ते माहीत नाही पण गॅस वितरकांनी यात जातीने लक्ष्य घालून ग्राहकांना होणारा त्रास थांबवावा अशी आग्रही विनंती ग्राहकाकडून होत आहे.
विशेष म्हणजे हा घरपोच सेवा देणारा ग्रहस्थ कॅश मेमो सुद्धा देत नाही.

तरी वितरण कंपनी च्या मालकाने किव्वा व्यवस्थापक यांनी लक्ष्य घालून योग्य कारवाई करावी हीच अपेक्षा अन्यथा गॅस कंपनी ला तक्रार करावी लागेल.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */