• Wed. Sep 16th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ने 160 पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्यांची तपासणी, तब्ब्ल 04 जिल्हे 350 किमीचा सतत प्रवास करून, बुलेट चोरीचा गुन्हा उघडकीस….

ByAshok Mishra

Sep 16, 2026
[8:59 pm, 15/9/2026] +91 832 985 6584: स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ने 160 पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्यांची तपासणी, तब्ब्ल 04 जिल्हे 350 किमीचा सतत प्रवास करून, बुलेट चोरीचा गुन्हा उघडकीस….!

पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला येथे दिनांक १०/०९/२०२६ रोजी गुन्हा रजि. नं. ५३१/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये बुलेट मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात फिर्यादी यांची काळ्या रंगाची बुलेट मोटारसायकल क्र. एम.एच. ३० ए.एक्स. ००११, किंमत अंदाजे ८०,०००/-रुपये ही रामदासपेठ, अकोला परिसरातील पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.
> तपासादरम्यान मिळालेल्या गोपनिय माहिती वरून तसेच तांत्रीक तपासावरून यातील नमुद आरोपी हे चंद्रपुर जिल्हयातील असल्याचे निष्पन्न झाले.

> स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ भद्रावती, जि. चंद्रपूर येथे रवाना होवुन तेथील स्थानिक पोलीसांच्या मदतीने संशयीत इसम नामे सुजल रितेश आनंदवार, वय १८ वर्षे, रा. पंचशील नगर, चांदिका वॉर्ड, भद्रावती, जि. चंद्रपूर व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेतले तसेच त्यांचे जवळुन गुन्हयातील चोरी गेलेली काळ्या रंगाची बुलेट क्र. एम. एच. ३० ए.एक्स. ००११ कि.अं. सा. किंमत अंदाजे ८०,०००/- रुपये जप्त करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ने 160 पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्यांची तपासणी, तब्ब्ल 04 जिल्हे 350 किमीचा सतत प्रवास करून बुलेट चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला येथे सुरू असून, आरोपीकडून चोरीच्या इतर गुन्ह्यांबाबत माहिती मिळते का, याबाबतही तपास करण्यात येत आहे.
[10:15 pm, 15/9/2026] +91 832 985 6584: अकोला:हिवरखेड पोलीस स्टेशन मधे शांतता समीती ची बैठक सपन्न.
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
हिवरखेड शहराची परपंरागत दोन दिवस चालनारी गणपती बाप्पा ची मिरवनूक निघनार असून दहा दिवस चालनारा ऊत्सवात व मिरनूकीत सर्वानी गून्या गोवींदानै सहभागी होऊन हा ऊत्सव साजरा करावा असे ठानेदार सचीन पाटील याचे अध्यक्षतेखाली सपन्न झालेली बेठक प्रसगी ते बोलले तसेच मिरवनूकीत सहभाग घेनारे मंडळांनी ऐक मैकाचा व मंडळा सोबत समन्वय साधत एकतेचे दर्शन घडवावे तसेच शासनाचे पाच लक्ष रुपयाचे बक्षीस आपल्या मंडळाकडे कसे येनार या बाबत विचार करावा सामाजीक सलोखा राखत मिरवनूकीत एकतेची मिसाल कायम ठेवनार हिवरखेड गावात सर्व हिंदु मूस्लीम आपले सन तीवार आपआपल्या परीने साजरा करतात व गावाची ऐकता कायम ठेवतात शातंता समीती पञकार सदैव पोलीस प्रशासनाचे सहकार्याने पार पाडत असतात अतीक्रमण लोबलेंल्या वायरी रथयाञेतील ऊंच व लाब असलेल्या गाड्या जान्यासाठी रस्त्यातील अतिक्रमण मोकळे करावे रथाला
मिळालेले मागील वर्षाचे क्रमांक नूसार रथ काढन्यात येनार सर्व मंडळ अध्यक्ष ऊपाध्यक्ष यानी समन्वय साधून टीळंकाच्या या ऊत्सवास सर्वानी सामाजीक सास्कृतीक व एकात्मतेने साजरा करनार असे गावचे पोलीस पाटील प्रकाश पाटील गावंडे! कीरण सेदानी , शाम भोपळे, महेद्र कराळे,,बं, माजी जि प ऊपाध्यक्ष जमीरऊल्लाखाॅ पठान डाॅ राम तिडके !महेद्र भोपळे, यांनी आपले विचारमाडून भूमीका मांडली अक्षय मोरखडे प्रथमैश नाठे,पुरषोत्तम गावंडे, आजमखा पठान नगरसेवक,रामेश्र्वर हागे राजूखाॅन केलेवाले, हिफाजत खाॅन पञकार बाळासाहेब नेरकर जमीर शेख , फारूखभाई सूदाम राऊत सह मंडळाचे कार्यकर्तै हजर होते या शातता समिती सभेचे सचांलन पञकार केशव कोरडे यांनी तर आभार प्रदर्शन हेड काॅन्सटेबल विजय फोकमारे यांनी मानले

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */