अँकर . . वर्धा येथील पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जनतेला आव्हान केले आहे की निर्धारित वेळ व ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करू नये, तसेच लेझर लाईट वापराबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वर्धा पोलीस दलाकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. वर्धा पोलिसांकडून यावर्षी ‘गणराया गणेश मंडळ स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सर्व गणेश मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा.
सर्वांना आवाहन आहे की, कायद्याचे पालन करावे, पोलिसांना सहकार्य करावे. कुठलाही संशयास्पद भाव आढळल्यास तात्काळ त्याची माहिती पोलिसांना द्यावी. यावर्षीचा गणेशोत्सव भक्तीने, शिस्तीने, शांततेने आणि सामाजिक एकोप्याने, तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने आणि ध्वनी प्रदूषणमुक्त साजरा करावा वर्धा जिल्हा पोलीस दल – आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे .
प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा
बाईट . . पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल
