अकोट ग्रामीण पोलिसांनी शासनाच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेतील पाईप चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे.
– चोरीला गेलेले पाईप: ₹ 9,39,228 किमतीचे
– जप्त मुद्देमाल: दोन आयशर ट्रक, एक फोरव्हीलर वाहन
– एकूण जप्ती: तब्बल ₹ 43,39,228/-
– आरोपी: 3 आरोपींना अटक
शासनाच्या करोडो रुपयांच्या योजनेतील साहित्य चोरीला जात असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अकोट ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून या टोळीला रंगेहाथ पकडले.
या धडाकेबाज कारवाईमुळे चोरीच्या आणखी घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
