या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सुभाष सरीचंद पवार ( पोलीस हवालदार) कन्नड यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून मिळालेली माहिती नुसार पोलीस उपअधीक्षक आरती पवार यांच्या तोंडी आदेशानुसार मी पोलीस हवालदार पगारे, पोलीस कॉन्स्टेबल नरवडे यांनी अवैध धंदे करणार्यांची माहिती काढून अंधानेर कडे निघालो असता गोपनीय ख़बर मिळाली की, आंबाडी धरण येथून अवैध पद्धतीने मुरुम वाहतूक होत आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर दोन पंच सोबत घेण्यात आले आणि आम्ही अंधानेर फाट्या कडून अंधानेर गावाकडे जात असताना गावातील तुपे हॉस्पिटल समोरून दोन ट्रैक्टर येताना दिसले ज्या मध्ये मुरुम भरलेला आढळून आला. आम्ही ड्रायव्हर चे नाव विचारले असता अजमल शेख अजीममोद्दीन वय 35 राहणार सरस्वती कॉलनी कन्नड, आणि मजहर शेख अहमद नूर वय 27 राहणार करीमनगर कन्नड असे आहे.
त्यांच्या कडून सोनालीका कंपनी चे लाल रंगाचा विना नंबर चा ट्रॅक्टर पासिंग न. क्र. M.h.20 4522 ज्याची अंदाजे किंमत ट्रॉली आणि हस्तगत केलेला मुरुम यांची एकूण किंमत अंदाजे 4,03,000 हजार रुपये, आणि एक निळ्या रंगाचे विना नंबर चे ट्रॅक्टर m.h.20 जी व्ही 2347 ज्याची किंमत अंदाजे 4,03,000 हजार रुपये अशी दोन्ही मिळून एकूण 8, 06 ,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून कन्नड शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे.
ड्रायव्हर स्वतः मालक असल्याने त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303( 2) 3(5) सहकलम 21(1)(2)(3)(4) गौन खनिज कायदा.प्रमाणे कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
