अँकर :
हदगाव शहरासह तालुक्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध शासकीय कार्यालयांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
व्हॉइस ओव्हर :
हदगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या हस्ते, तहसील कार्यालयात तहसीलदार सय्यद उमर यांच्या हस्ते, तर नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष सौ. रोहिणीताई भास्करदादा वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
तसेच हदगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. विविध ठिकाणी राष्ट्रगीत, मराठवाडा गीत आणि देशभक्तीपर गीतांसह कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अँकर क्लोज :
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हदगाव तालुक्यात देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा उत्साह पाहायला मिळाला.
