अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
अकोला: अपुरा पाऊस, करपलेली पिकं आणि डोळ्यात नुकसान भरपाईची आस… अशा अवस्थेत असलेल्या बळीराजाने आज आपला आक्रोश जिल्हाधिकारी कार्यालयावर व्यक्त केला.
खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करत जिल्ह्यात आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी सरकारला दिली.
आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा.
हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या.पीकविम्याची रक्कम तात्काळ जमा करा.पुढील हंगामासाठी मोफत बियाणे-खते उपलब्ध करा.
जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा.
