• Tue. Sep 22nd, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

गोंदियात घरगुती गणेशोत्सवातून ८०च्या दशकातील ग्रामीण जीवनाचा देखावा

ByAshok Mishra

Sep 22, 2026

बदलत्या काळासोबत माणसाची जीवनशैली, संस्कृती आणि दैनंदिन राहणीमानात मोठा बदल झाला आहे. डिजिटल युगात तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक गतिमान झाले असले, तरी भूतकाळातील साधेपणा, आपुलकी आणि निसर्गाशी असलेले नाते कुठेतरी मागे पडताना दिसते. याच बदलाची जाणीव नव्या पिढीला करून देण्यासाठी गोंदियातील सिव्हील लाईन परिसरातील गणेशभक्त त्र्यंबक जरोदे यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात अनोखा देखावा साकारला आहे.

VO :- या देखाव्यात तब्बल चार दशकांपूर्वीच्या म्हणजेच १९८० च्या दशकातील ग्रामीण जीवनशैली आणि आजच्या २०२६ मधील आधुनिक जीवनशैलीचा सुंदर तुलनात्मक आढावा मांडण्यात आला आहे. मातीची घरे, कौलारू छप्पर, अंगणातील तुळशीवृंदावन, विहिरीवरून पाणी भरणाऱ्या महिला आणि बैलांच्या साहाय्याने शेती करणारे शेतकरी… अशा अनेक बारकाव्यांमधून त्या काळातील ग्रामीण जीवनाचा अनुभव या देखाव्यातून घेता येतो. त्या काळातील साधेपणा, निसर्गाशी असलेले नाते, एकमेकांशी असलेली आपुलकी आणि तंत्रज्ञानाशिवायही आनंदी असलेले जीवन या देखाव्यातून प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला २०२६ चे आधुनिक जीवन दाखवताना उंच इमारती, काँक्रीटचे रस्ते, स्मार्टफोनमध्ये व्यस्त असलेली माणसं आणि स्क्रीनच्या दुनियेत हरवत चाललेला प्रत्यक्ष संवाद यांचे चित्रण करण्यात आले आहे.

:- गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक वातावरण निर्मिती न करता, बदलत्या समाजजीवनाचा आरसा दाखवण्याचा हा प्रयत्न नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच आधुनिक जीवनशैलीचा विचार करण्यास भाग पाडणारा हा देखावा गोंदियातील घरगुती गणेशोत्सवाचे खास आकर्षण ठरत आहे. भूतकाळातील साधेपणा आणि वर्तमानातील आधुनिकता… या दोन्हींचा अनोखा संगम घडवणाऱ्या त्र्यंबक जरोदे यांच्या गणेशोत्सवाच्या देखाव्याची सध्या गोंदियात चांगलीच चर्चा आहे,

सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968