• Fri. Sep 25th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

पांढरी येथे तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

ByAshok Mishra

Sep 25, 2026

डोक्यात गंभीर मार लागल्याने अमोल शिंगणे जखमी; अमरावतीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू. | अमरावती जिल्हा -प्रतिनिधी

पांढरी, ता. अंजनगाव सुर्जी येथे पैशांच्या वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना २३ सप्टेंबर २०२६ रोजी घडली. या प्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरी येथील अमोल कृष्णाजी शिंगणे (वय ४०) यांच्या भाऊ गोपाल कृष्णाजी शिंगणे यांनी डायल ११२ वर फोन करून भावाला काही लोकांनी मारहाण केल्याची माहिती दिली. त्यानंतर अमोल शिंगणे यांना ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव सुर्जी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जखमी अमोल शिंगणे यांचे भाऊ गोपाल कृष्णाजी शिंगणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कमलेश सुंदरलाल पटेल (वय ५०, रा. पांढरी) याच्यासोबत डीजेच्या पैशांवरून वाद झाला. या वादातून आरोपीने अमोल यांना आपल्या घरामध्ये नेऊन लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२६/२०२६, कलम १०९(१) BNS अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास अंजनगाव सुर्जी पोलीस करीत आहेत. जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968