• Fri. Sep 25th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

आमदार राजेश विटेकर यांनी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन केली पाहणी; सोनुळा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर संवाद

ByAshok Mishra

Sep 25, 2026

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

मानवत तालुक्यातील सोनुळा येथील शेतकरी धम्मपाल सोनटक्के यांच्या शेतात अतिवृ ष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री ना. मेघना बोर्डीकर यांच्या पाहणी दौऱ्यात सोनुळा येथील हा पॉईंट डावलण्यात आल्याने शेतकऱ्यां मध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर पाथरी – मानवतचे आमदार राजेश विटेकर यांनी आज धम्मपाल सोनटक्के यांच्या शेतात, बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी धम्मपाल सोनटक्के यांनी हातात करपून, सडून गेलेले सोयाबीनचे पीक घेऊन आपली व्यथा मांडली. कालचा पालक मंत्र्यांचा दौरा होता, त्या दौऱ्याचा पॉईंट आम्ही सगळ्यांनी, संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी, तलाठ्याने दिला होता तसेच मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तरी ही पालकमंत्री आमच्या पॉईंटवर आल्या नाहीत, असे त्यांनी आमदारांसमोर सांगितले. आमदार विटेकर यांनी सोनटक्के यांच्या शेतातील उभ्या पिकाची पाहणी करत अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. धम्मपाल सोनटक्के असोत किंवा तालुक्यातील व परिसरातील सर्वच शेतकरी, कोणाला ही वाऱ्यावर सोडणार नाही. शासनाकडे पाठपुरावा करून सरसकट मदत आणि पीक विमा मिळवून देईन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी मानवत तहसीलचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड, उपसभापती सुरज काकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नारायण भिसे, संतोष लादाने, अंबादास तुपसमुद्रे, तोफीक खान, बळीराम पतंगे, दादासाहेब भोरकडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968