अकोला: शहरातील व गणपतीची भव्य विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात निघाली.
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़
ढोल-ताशांच्या गजरात, आरती, दिंडी आणि हजारो भक्तांच्या उत्साहात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.
पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि आकर्षक विद्युत रोषणाईने मिरवणुकीची शोभा वाढवली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अकोल्यातील मानाच्या १२ भाई गणपतीची भव्य विसर्जन मिरवणूक; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात शहर दुमदुमले
