– दिनांक २७/१०/२०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मौजा बोथली शेत शिवारात एका अज्ञात इसमाचे खून झालेला आहे. मिळालेल्या माहितीवरून तात्काळ घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले व मृतक हा बोथली येथील चंद्रशेखर दहिकर गुरुजी असल्याचे समजले. फिर्यादी सौ. शकुंतला चंद्रकुमार पाथोडे , पोलीस पाटील, वय ४५ वर्ष,रा. जवरी ता.आमगाव जि.गोंदिया यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन आमगाव येथे चंद्रशेखर भास्कर दहीकर वय ६१ वर्ष राहणार बोथली यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने विटाने मारहाण करून हत्या केल्याने पोलीस स्टेशन आमगाव येथे अप क्रमांक ६८६/२०२६ कलम १०३(१)भा.न्या.संहिता 2023 अन्वये नोंद करुन अज्ञात आरोपीचा कसोशीने शोध सुरु करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे सर यांनी दिलेल्या सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे ,स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील अधिकारी व अमंलदार पो.स्टे. आमगाव हद्दीत खुनाबद्दल गोपनीय माहिती काढत असताना बातमीदाराकडुन खात्रिशीर गोपनीय तसेच तांत्रिक माहीती मिळाली की, मृतक चंद्रशेखर भास्कर दहीकार वय ६१ वर्ष राहणार बोथली हा आपल्या घरी एकटा राहायचा व माहे सप्टेंबर -२०२६ मध्ये त्याने त्याचे आमगाव येथे असलेली जमीन त्याच्या गावातील राहणारा अजय ब्राह्मणकर याचे मध्यस्थीने विक्री केली होती व त्याचे ५ लाख रुपये टोकन म्हणून घेतले होते व त्यापैकी ४ लाख रुपये अजय ब्राह्मणकर याचे बँक खातेमध्ये ठेवले होते. जमिनीचे कागदपत्रे बरोबर नसल्याने त्या जमिनीचा रजिस्ट्री होत नव्हते त्यामुळे सौदा तुटल्याने टोकन मध्ये दिलेले पाच लाख रुपये खरीददार यास दिनांक २७/१०/२०२६ चे १२.०० पर्यंत परत करायचे होते. मृतक याने अजय ब्राह्मणकर याचे बँक खातेमध्ये ठेवलेले ४ लाख रुपये परत मागितले होते परंतु
अजय ब्राह्मणकर याने ३.५० लाख रुपये शेयर मार्केटचे इंट्राडे ट्रेडिंग मध्ये बुडाले होते. त्यामुळे त्याचेकडे परत करण्यासाठी पैसे नव्हते.
अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखांचे पथकाने संशयित नामे अजय शामराव ब्राह्मणकर वय २१ वर्ष रा. बोथली यास ताब्यात घेतले व त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता अजय ब्राह्मणकर याने सांगितले की, मृतक हा त्याला ४ लाख रुपये परत मागत होता व त्याचेकडे परत करण्यासाठी पैसे नसल्याने आरोपी अजय ब्राह्मणकर याने दिनांक २६/१०/२०२६ रोजी मृतकास जीवे ठार मारण्याचा निश्चय करून रात्री १०.०० वाजता दरम्यान त्याचे राहत्या घराजवळ जाऊन तो गावाकडून घरी परत येत असताना त्याचेवर विटाने डोक्यावर व छातीवर मारून खून करून मृतकाचे शव घरसमोरील झुडपात लपवून ठेवल्याची कबुली दिली . आरोपी अजय ब्राह्मणकर वय २१ वर्ष यास पुढील कायदेशीर कारवाई करिता पोलीस स्टेशन आमगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री रेवचंद सिंगनजुडे यांचे नेतृत्वात सपोनि अमरदीप खाडे, सफौ राजू मिश्रा, पोहवा तुळशीदास लुटे, पोहवा दीक्षितकुमार दमाहे, पोहवा विठ्ठलप्रसाद ठाकरे, पोहवा महेश मेहर, पोहवा संजय चव्हाण, पोहवा सुबोध बिसेन, पोहवा सोमेन्द्रसिंग तुरकर, पोहवा रियाज शेख, पोहवा राजकुमार खोटेले, पोहवा भोजराज बहेकार, पोहवा इंद्रजित बिसेन, पोशि राकेश इंदुरकर, पोशि हंसराज भांडारकर, पोशि छगन विठ्ठले,पोशि कुणाल बारेवार, पोशि निखिल मेश्राम, नापोशि शैलेश निनावे, चापोशि राम खंदारे, चापोशि इमरान सैय्यद, चापोशि विलेश ठाकरे, सायबर सेलचे सपोनि देविदास ठमके, पोशि योगेश राहिले, श्रेयस लांबट यांनी केली आहे
