• Fri. Sep 18th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

नांदेड / हदगाव | अतुल राऊतराव स्लग : दत्ता पाटील यांचे २०व्या दिवशी जे जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या हस्ते उपोषण समाप्त

ByAshok Mishra

Sep 17, 2026

अँकर :
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या दत्ता पाटील यांची प्रकृती खालावली. काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच उपोषणाच्या विसाव्या दिवशी दत्ता पाटील यांनी तेथील डॉक्टरांच्या हस्ते उपोषण सोडले.

व्हॉइस ओव्हर :
सलग उपोषणामुळे प्रकृती खालावलेल्या दत्ता पाटील यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर हदगावचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी रुग्णालयात जाऊन दत्ता पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत कोणत्याही अडचणीच्या काळात आपण सदैव सोबत असल्याचे सांगितले. उपचार घेत असतानाच उपोषणाच्या विसाव्या दिवशी दत्ता पाटील यांनी उपोषण सोडले. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची सांगता झाली.

अँकर क्लोज :
वीस दिवसांच्या उपोषणानंतर दत्ता पाटील यांनी उपचारादरम्यान उपोषण सोडल्याने आंदोलनाची सांगता झाली.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें