• Fri. Sep 18th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

कन्नड प्रतिनिधी:रायभान साळवे पिशोरमध्ये आकाशातून काळाचा घाला; वीज पडून तिघांचा मृत्यू, तिघे गंभीर

ByAshok Mishra

Sep 17, 2026

कन्नड तालुक्यातील पिशोर येथे आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे.
पिशोर-सिल्लोड रोडवरील गट क्रमांक ७१ मध्ये वीज पडल्याने तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेत फरजाना हमीद सय्यद, वय ३८ वर्षे, तसलीम बानो मुक्तार सय्यद, वय ५० वर्षे आणि अलविरा हनीफ सय्यद, वय १६ वर्षे यांचा मृत्यू झाला.

तर हमीदा हनिफ सय्यद, अनिसा निसार सय्यद आणि हफिज खलील सय्यद हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेमुळे पिशोर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वीज पडण्याच्या घटनांपासून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पिशोरमधील या दुर्दैवी घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें