अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़
आज दि : १६/०९/२०२६ महिला पोलिस शिपाई उज्वला इटिवाले हे जठारपेठ चौक येथे कर्त्यावर असताना वाहन तपासणी करीत असताना त्यांना एक वाहन संशयित वाटलं त्यांनी सदर वाहनाचे थांबून चेक केले असता सदर वाहन चोरी चे निघाले त्यांनी सदर माहिती जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखा चे पोलीस निरीक्षक मा. विलास पाटील साहेब यांना दिली सदर वाहन व आरोपी याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी चार वाहन चोरी केले आल्याची कबुली दिली त्याच्याजवळून चोरीचे चार मोटर सायकल जप्त करण्यात आले आहे
सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब अर्चित चांडक साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी सर , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकाने केली
