अकोल्यात मुलांनी रस्ते सुरक्षेची जबाबदारी घेतली!
हेल्मेट घाला, एक जीव वाचवा!
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
आज अकोल्यामध्ये एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले, जिथे लहान मुलांनी वाहतूक पोलिसांची भूमिका बजावत लोकांना रस्ते सुरक्षेचा धडा शिकवला.
मुलांनी काय केले?
हेल्मेट न घातलेल्या पादचाऱ्यांना थांबवण्यात आले.
हेल्मेट घालण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
“जीवन अनमोल आहे” असा संदेश दिला.
पत्रके वाटून जनजागृती करणे
लहान हातांतील मोठे संदेश असलेले फलक आणि त्यातील निरागस आवाहनाने वडीलधाऱ्यांनाही विचार करण्यास भाग पाडले.
या लहान सैनिकांना सलाम!
अकोला पोलिसांच्या आणि या मुलांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
