व्हॉइस ओव्हर :
हदगावच्या श्री सुभाष शुगर प्रा. लि. कारखान्यात आगामी सातव्या गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.
यंदा पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ‘शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळू दे आणि वरुणराजाची कृपा होऊ दे’, अशी प्रार्थना करत वरुणराजाला साकडे घालण्यात आले.
चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख यांच्या आशीर्वादाने आणि कार्यकारी संचालक सुशीलकुमार सुभाषराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात सचिन पवार आणि सुरज वानखेडे यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून बॉयलर अग्नीप्रदीपन केले.
यावेळी राजेश मानधना, सोमाप्पा, मधुकर पतंगे, गिरजेश वर्मा, किशोर वानखेडे, एकनाथ गीते, बालासाहेब कांडगे, भास्कर गावंडे, जयजित निलंगेकर, जितेंद्र ठोंबरे, मुकेश वाघमारे आणि मंगेश फड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते. आगामी हंगाम यशस्वी आणि विक्रमी ठरावा, यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
